प्रसिध्दीपत्रक
सध्या भारतात उद्योजकता आणि नवीन गोष्टींचा प्रारंभ हे तरुण लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.
या वातावरणाला प्रोत्साहन देवून तरुणांसाठी अनुषंगिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
याच उद्देशाने जागतिक उद्योजकता सप्ताहा दरम्यान, म्हणजेच दि. १८ ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुणे येथे युथएड फाऊंडेशन,
सी.वाय.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यंग एंटरप्रेनर समिट’ (www.yesummit.org) चे आयोजन केले आहे.
या समीट चा उद्देश तरुण व्यक्ती व नवीन कल्पनांच्या सहाय्याने उद्योजकता वाढीकडे मार्गक्रमण करणे हा आहे.
आमचा असा ठाम विश्वास आहे की एखाद्या नवीन संकल्पनेस वाढण्यास, बहरण्यास प्रोत्साहन दिल्यास,
मार्गदर्शन केल्यास त्या समाजामध्ये जास्तीत जास्त संपदा व नोकरी निर्माण करण्यासाठी सक्षमपणे उभ्या राहू शकतील.
मागील वर्षी 30 उत्साही तरुणांनी विविध श्रेण्या व स्तरांवर स्वयंरोजगाराला सुरुवात केली.
त्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ४५,००० वरून रु. २,२३,५०० पर्यंत म्हणजेच ४०० % वाढले.
वाढीच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सुरु आहे.
ह्या वर्षीचा कार्यक्रम वेगवेगळया स्तरांवर होणार असून त्यामध्ये वेगवेगळया ठिकाणी,
दोन दिवसांच्या कार्यशाळा घेवून त्याद्वारे युवा उद्योजक तसेच सामाजिक उद्योजक यांचा शोध घेणे किंवा त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पनांना रोमोजी किरण विद्यापीठ हैद्राबाद येथे उद्योजकतेसंदार्भातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
आणि अशा ३०० उद्योजकांना नोव्हेंबर २०१७ मध्ये पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘यंग एंटरप्रेनर समिट’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
समिट नंतर देखील सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल, वेगवेगळ्या एजन्सीजशी जोडण्यास सहाय्य केले जाईल तसेच हे सर्व सहभागी युथएड फाऊंडेशनने सुरू केलेल्या यंग एंटरप्रेनर्स नेटवर्कचा भाग होतील.
(C.Y.D.A) नाविन्यपूर्ण
संकल्पना असलेल्या उद्योजक व सामाजिक
उद्योजकांकडून व्यवसाय संकल्पना मागवित आहे.
Comments
Post a Comment