इंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना...इंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना... 
मानवाच्या मुलभूत गरजा काय आहे असा जर का कोणी प्रश्न केला तर सहज उत्तर मिळते कि, अन्न, वस्त्र, निवारा पण आता सद्य स्थितीत त्यात शिक्षण ह्या महत्वपूर्ण गोष्टीचा देखील त्यात विचार केला जातो. किती शिक्षण पूर्ण केले म्हणजे समाधान वाटेल हे सांगता येणे जरा अवघड आहे कारण आपल्या धेय्या पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असेलेले ज्ञान मिळाले म्हणजे शिक्षण मिळाले असे काहींचे मत असते तर, फक्त लिहिता वाचता आले म्हणजे समाधानकारक शिक्षण मिळाले अशी काहींची मते आहे, काहींच्या मते व्यावहारिक ज्ञान म्हणजे शिक्षण आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाची शिक्षण आवश्यक गोष्टीबाबत वेगवेगळी समज आहे पण त्या शिक्षणातील एक महत्वाचे शिक्षण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण! हे शिक्षण घेताना काहीना अनंत अडचणी येतात तर काहीना अडचणीच येत नाही

 अजीज प्रेमजी मार्फत करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालात त्यांनी म्हंटले आहे कि, भारतामध्ये वीस हजार पर्यंत वार्षिक उत्त्पन्न असणाऱ्या घरातून जन्मलेल्या बालकांपैकी फक्त ६५.% इतकेच बालक शाळेत आपले नाव नोंदवतात तर चाळीस हजार उत्पन्न, साठ हजार आणि साठ हजारावरील उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयातून अनुक्रमे  ७५.%, ८०.%, ८६.% इतके प्रमाण आहे आणि महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर हेच प्रमाण अनुक्रमे, ८२.%, ८४.% ,९०.%, ७६.% इतके प्रमाण आहे. (संदर्भ –the social context of elementary education in rural India, October 2004) त्याचसोबत आठवी पर्यंत येत येत ह्यांच्या पैकी ५३.% मुला,मुलींची शाळेतून गळती होते. म्हणजे उर्वरित संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत हलाखीच्या परीस्थित शिक्षण घेणाऱ्या सर्वाना प्रबळ इच्छा असूनही महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही.त्याची करणे हि 
अशाच एका युवकाचा अनुभव आशोक हातागळे.... मी एका आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या तसेच अनुसूचित जाती च्या कुटुंबातील युवक आहे  जिथे मला माझे प्राथमिक चे शिक्षण घेणे  सुद्धा आवघड होते आशा परिस्थितीत कसे बसे पदवीपर्यंतचे  शिक्षण पूर्ण केले.ऐकून घरची परिस्थिती लक्षांत घेऊन पुढचे  शिक्षण शहरात जाऊन शिकणे माझासाठी कठीणच होते मग मला सी. वाय. डी. . इंटर्शीप कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यानंतर मी उपक्रमात सहभागी झालो.  कार्यक्रमादरम्यान मला पुढील वाटचालीची दिशा मिळत गेली माझा वैयक्तिक व्यावसायिक दृष्ट्या आत्मविश्वास वाढत गेला. येथे मला वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो. Internship (कार्यकाल कालावधी) पूर्ण केल्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथून पुढील शिक्षण घेतले. आता मी मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करीत आहे. सी.वाय.डीए. संस्थेच्या Internship कार्यक्रम माझ्यासाठी जीवनात बदल घडवणारा प्रेरणा देणारा राहिला.
ह्या परिस्थितीवर मात करून देखील उच्च शिक्षण घेणारे अनेक व्यक्ती आहेत ते सर्व कदाचित स्वप्रोत्साहित (सेल्फ मोटीव्हेटेड) असतील पण प्रबळ इच्छा असणाऱ्या व्यक्तींना जरा अजून प्रोत्साहित करण्याची गरज असते त्यामध्ये  अभ्यास करून काही वेळ काम करून निदान काही खर्च भागत असल्याने शिक्षण घेताना येणारा आर्थिक ताण थोडासा कमी नक्कीच झाला असेल. भारतामध्ये भारताबाहेर इंटर्नशिप स्वरूपात काही कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून महाविद्यालयीन जीवन करून फ्रेशर म्हणून बाहेर पडलेल्यांना कामाचा थोडा अनुभव यावा पुढील व्यावसायिक जीवन हे अधिक सोयीस्कर होईईल ह्या दृष्टीने अनेक शैक्षणिक संस्था इतर संस्था अश्या इंटर्नशिप कार्यक्रमाचे आयोजन करत असते पण मी पाहिलेला एक आगळा वेगळा इंटर्नशिप म्हणजे सी.वाय.डी.. ह्या संस्थेचा कमवा शिका हा उपक्रम! ह्या उपक्रमाची वैशिष्ठे अशी कि, महाविद्यालयीन शिक्षण सुटलेल्या युवक,युवतींना शिक्षण पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा जागृत करून ते पूर्ण करण्यास मदत करणारा इंटर्नशिप कार्यक्रम. ह्या संस्थे मार्फत अनुसूचित जाती,जमातीतील युवक,युवतींनी इंटर्नशिप पूर्ण करून ना केवळ शिक्षण घेतले तर ते आज चांगल्या पदावर देखील कार्यरत आहेत. अश्या प्रकारे इंटर्नशिप कार्यक्रम, शिका कमवा योजना हि शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वच युवक,युवतींसाठी संजीवनीच आहे.
                                                                                                             विलास बनसोडे  
                                                                                                               सी.वाय.डी..
                                                                                                              ८१४९१४९५६१


Comments