शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेचा अनुभव.....

दिनांक २६ ऑगस्ट २०१७ रोजी सी. वाय. डी. पुणे, फोर्ब मार्शल व माध्यमिक विभाग शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड याच्या संयुक्त विध्यमाने सरकारी व खाजगीशाळेच्या शिक्षकांसाठी फोर्बेस मार्शल प्रशिक्षण हॉल याठिकाणी आर्धदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.. त्या वेळी टिपलेले क्षण....
खूप खूप धन्यवाद !! सहभागी शिक्षक वृद.....
अभिप्राय

शिक्षकांसाठी  आयोजित कार्यशाळेचा अनुभव.....
आजच्या किशोरवयीन मुलांच्या खूप साऱ्या समस्या मला एक तरंग प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळतात , ऐकायला हि येतात. सध्याच्या किशोरवयीन मुलांमध्ये गोधाळलेली आवस्थ (भावनिक दृष्टया ) दिसून येते. या मुलांना खूपसा  पालक वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून मुले हि सर्वस्वी शाळेवरच आवलंबुन आहेत.  शिक्षकाकडून, शाळेकडून, समाजाकडून खूपसाऱ्या अपेक्षा आहेत.
सी. वाय. डी. पुणे,  संस्थेमार्फत जसे विविध शाळांमध्ये विधार्थ्यानां जीवन कौशल्य (लैगिक शिक्षण) शारीरिक बदला बाबत माहिती दिली जाते आहे तसेच विविध शाळांमध्ये  मुलांना खूप साऱ्या समस्या आहेत. हि मुल भावनिक दृष्टया गोधाळलेली आहेत. मोबाईल च्या आधिन झालेले दिसतात पालकाचे ऐकात नाहीत. शिक्षकांना हि ते ऐकात नाहीत,अभ्यासात  रस नाही, शाळेत यायला आवडत नाही. जर  शाळांन मध्ये समुपदेशन केंद्र स्थापन केले व मुलांच्या समस्यां जाणून घेतल्या तर याचा नक्कीच अधिक फायदा मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी होईल....
जेणे करून आशा मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकतो........
सदर प्रतिक्रिया प्रशिक्षणार्था कडून मिळाली...


Comments